… तर मिशा काय भुवया पण काढून टाकीन- उदयनराजे

उदयनराजे भोसले

सातारा: आपल्या रोकठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असणारे साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी जनतेकडे आशीर्वाद मागितले आहेत तसेच जनतेसाठी मी सदैव तत्पर आहे. जनतेची कामे नाही केली तर मिशा काय भुवया पण काढून टाकीन असा दावा देखील केला आहे.

 कमी बोलतो पण लोकांच हिताचे बोलतो. कोणाला आवडो अगर न आवडो. मला काही कुणाचे देणे घेणे नाही.जनतेसाठी मी सदैव तत्पर आहे. जनतेची कामे नाही केली तर मिशा काय भुवया पण काढून टाकीन. असेच आपल्या सगळ्यांचे आशिर्वाद राहो. असेच सगळ्यांंचे सहकार्य राहो. असे खासदार उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. सातारा येथील घरकुल वाटप कार्यक्रमात ते बोलत होते.