पवारांनी ‘कॉलर’ उडवली… आणि उदयनराजे थेट मुख्यमंत्र्यांच्या भेटीला !

टीम महाराष्ट्र देशा : आजपर्यंत खासदार उदयन राजे आणि अजित पवार यांच्या फारकतीची वेळ आली तरी शरद पवार कदीच मध्ये पडले नाहीत. उदयनराजेंवरुन निर्माण होणाऱ्या सर्व प्रश्नांना पवारांनी आतापर्यंत शांतपणे उत्तरं दिले आहे. मात्र आज पहिल्यांदाच त्यांनी उदयनराजेंच्या स्टाईलवरुन चांगलेच टोले मारले. तसेच उदयनराजेंच्या वाढदिवसाच्या दिवशी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी आयोजित कार्यक्रमाकडे पाठ फिरवली मात्र शरद पवार आवर्जून उपस्थित राहिले. आज पवारांनी उदयन राजेंचे पंख कापण्याचे संकेत दिले आहेत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार उदयनराजे यांना टोला मारला. ‘आपल्यासमोर सर्वांच्या कॉलर खाली असतात’ अस म्हणत पवारांनी राजे स्टाईलवर शाब्दिक फटकारे मारले.

त्यानंतर अवघ्या काही तासांतच उदयनराजे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. शरद पवार यांच्या हल्ल्यानंतर या भेटीला विशेष राजकीय महत्व प्राप्त झालं आहे. राजधानी महोत्सव सातारा 2018 या कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी यासाठी निमंत्रण देण्यासाठी उदयनराजे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असली तरी या दोन नेत्यांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा झाली आहे. या चर्चेचा तपशील समोर आला नसला तरी शरद पवार यांच्या मिश्कील टिपण्णी नंतर राज्याच्या राजकारणात ही सर्वात मोठी घडामोड मानली जात आहे.

Loading...

दरम्यान , साताऱ्यामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत राजकारण पेटले आहे. खासदार उदयन राजे समर्थक आणि विरोधक यांच्या नेहमीच शाब्दिक युद्ध होते. खासदार छत्रपती उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे यांच्या समर्थकांमध्ये सुद्धा शाब्दिक चकमक होत असते.

याचं मुद्द्यावरुन पत्रकारांनी शरद पवारांना जिल्ह्यात पक्षांतर्गत निर्माण झालेल्या पेचाबाबत प्रश्न विचारला असता. पवार म्हणाले, “काही पेचबीच होत नाहीत. मी असल्यावर सगळं ठीक होतं. उतारा काढायची वेळच येत नाही. तुम्ही बघा त्यावेळेस सगळे सरळ असतात. अशी असते ती कॉलर अशी होते” अशी शाब्दिक टिपणी करत पवारांनी उदयनराजेंप्रमाणे उभी असणारी कॉलर पवारांनी खाली करुन दाखवली.

शरद पवार कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त साताऱ्यात आले होते. दरम्यान ते पत्रकार परिषदेत होते. शरद पवार यांनी पहिल्यांदाच उदयनराजेंच्या स्टाईलवरुन मिश्किलपणे भाष्य केले.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

'झारखंड निवडणुकीवेळी धोनीनं भाजपात प्रवेश न केल्याने BCCIने करारातून वगळले'
पंतप्रधान मोदी छत्रपती शिवाजी तर शहा तानाजींच्या रुपात; शिवसेनेच्या ढाण्या वाघाची पहिली प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे यांनीही पहिला 'तान्हाजी', चित्रपट पाहून म्हणाल्या...
'सत्ता गेली तरी चालेल, पण सावरकरांना भारतरत्न देण्याच्या शिवसेनेच्या मागणीला आमचा विरोध'
थोरात साहेब तुम्हाला घराणेशाहीतले 'युवा आमदार'दिसले पण शेतकऱ्याचं पोरगं देवेंद्र भुयार दिसला नाही का ?
कोणाशीही आणि कशीही युती करेन पण एकदा दिल्लीला जाणारच : महादेव जानकर
इतिहासावरून देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंमध्ये जुंपली
यातून शिवसेनेचा खरा चेहरा उघड झाला - देवेंद्र फडणवीस
वंशज असल्याचे पुरावे मागणे चुकीचेचं नाही तर मूर्खपणाचे
रावसाहेब दानवेनंतर शिवसेनेचे गुलाबराव पाटील ही म्हणाले सालेहो!