दोन राजकीय दिग्गज येणार एकत्र! राजकीय वैर मिटेल का?

uadaynraje,ajit pawar

सातारा : खासदार उदयनराजे भोसले आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्यात नेहमी राजकीय वाद पाहायला मिळाले. तसेच उदयनराजे यांनी अजित पवार भ्रष्टाचारी आहेत म्हणून त्यांच्यावर आरोप देखील केले होते. त्यामुळे या दोघांमध्ये वैर निर्माण झाले होते, मात्र उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे निमंत्रण अजित पवार यांनी स्वीकारले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या दोन दिग्गज नेत्यांचे वी मिटेल का? अशे प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाले आहेत.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचा २४ फेब्रुवारीला वाददिवसा निमित्त होणाऱ्या राजधानी महोत्सव असून अनेक राजकीय दिग्गजांना उदयनराजे भोसलेंनी निमंत्रण दिले आहे. उदयनराजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आगामी निवडणुकांसाठी राजकीय फिल्डिंग लावण्याच्या तयारीत असल्याचे समजते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे,केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, माजी मंत्री शरद पवार, रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा समावेश आहे. यामध्ये सर्वांना उत्सुकता आहे ती उध्दव ठाकरे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीची चर्चा आहे.