मुंबई : आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप वर पुन्हा कोरोनाचे सावट आल्याचे दिसत आहे. सुपर लीगचे उपांत्यपूर्व फेरीचे सामने सुरु असतानाच आता कॅनडा संघातील ९ खेळाडू पॉसिटीव्ह आल्याचे वृत्त बाहेर आले आहे. ज्यामुळे २ सामने रद्द करावे लागले आहेत.
शनिवारी कॅनडा आणि स्कॉटलँडचा दुसरा उपांत्यपूर्व फेरीचा सामना होणार होता. मात्र सामन्याआधी कॅनडा ९ खेळाडू कोरोना पॉसिटीव्ह आले आहे. ज्यामुळे हा सामना रद्द करावा लागला. तसेच दुसरा सामना पापुआ न्यू गिनी आणि युगांडा यांच्यात झालेल्या विजयी संघाचा होणार होता. तो हि सामना रद्द करण्यात आला आहे.
आयसीसीने रद्द झालेल्या सामन्यांबाबत आणि कोरोना पॉसिटीव्ह खेळाडूंबाबत एक निवदेनही जाहीर केले आहे. ज्यात त्यांनी लिहले ” शनिवारी होणारा कॅनडा आणि स्कॉटलँड यांचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना रद्द करण्यात आला आहे. तसेच खेळाडूंना आता विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. जिथे त्यांच्यावर लक्ष ठेवले जाईल.” ९ खेळाडू कोरोना पॉसिटीव्ह निघाल्याने कॅनडाच्या संघात खेळण्यासाठी पुरेसे खेळाडू नाहीत. सध्यातरी केवळ कॅनडाचे खेळाडू कोरोनाबाधित झाले आहेत. याआधीही भारताचे ५ खेळाडू कोरोना पॉसिटीव्ह आले होते. मात्र स्पर्धेच्या शेवटला प्रसार वाढल्याने हा आकडा वाढण्याची चिंता दर्शवण्यात येत आहे.