पक्षात पदे मिळाल्यानंतर स्वत:चे आर्थिक फायदे साधण्याचे प्रकार घडतात : अजित पवार

टीम महाराष्ट्र देशा :  पक्षात पदे मिळाल्यानंतर स्वत:चे आर्थिक फायदे साधण्याचे प्रकार घडतात. यामुळे पक्ष बदनाम होतो त्यामुळे अशा गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना सुनावले.मुंबईत शनिवारी राष्ट्रवादीच्या कार्यर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष सचिन अहिर यांच्या अध्यक्षतेखाली हे शिबीर पार पडले. यावेळी अजित पवार यांच्यासह प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या अध्यक्षा फौजिया खान, छगन भुजबळ, उपाध्यक्ष नवाब मलिक, दिलीप वळसे पाटील, महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ आदी नेत्यांची भाषणे झाली.

प्रत्येकाला मान-सन्मान द्यायला विसरू नका. अनेकांना असे वाटते की आपल्याला कोणी ओळखत नाही. मात्र, त्यांनी असे वाटून घेण्याचे कारण नाही कारण राष्ट्रवादी काँग्रेसच तुमची ओळख आहे. त्यांनी त्याचबरोबर संघटनेत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचा मानसही त्यांनी यावेळी बोलून दाखवला.

इनरव्हील क्लब ऑफ पिंपरीच्या अध्यक्षपदी मनीषा समर्थ

चले जाव चळवळ म.फुलेंनी सुरु केली, अजित पवार यांचा ‘जावईशोध’Loading…
Loading...