संतापजनक : मध्यप्रदेशमध्ये चिमुकलीवर पाशवी अत्याचार ; कोपर्डी घटनेची पुनरावृत्ती

टीम महाराष्ट्र देशा : इंदोरच्या महाराजा यशवंतराव होळकर हॉस्पिटलमध्ये एका वार्डात सात वर्षाची एक चिमुकली अॅडमिट आहे. तिची परिस्थिती इतकी वाईट आहे की जेव्हा ती शुद्धीत येते फक्त तिच्या किंचाळ्या कानी पडतात. भारत मातेला शरमेने मान खाली घालायला लावणारी अजून एक घटना मध्य प्रदेशमधील मंदसौरमध्ये घडली आहे. ‘निर्भयाकांड’ सारखीच ही घटना असून एका नराधमाने सात वर्षांच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी २० वर्षांच्या नराधमाला अटक केली असून या घटनेच्या निषेधार्थ मंदसौरमध्ये बंदची हाक देण्यात आली आहे.

मंदसौरमध्ये राहणारी आठ वर्षांची मुलगी मंगळवारी शाळेत गेली होती. ती दुसरी इयत्तेत शिकते. मंगळवारी संध्याकाळी तिचे आजोबा तिला घेण्यासाठी शाळेत गेले असता १५ मिनिटांपूर्वीच ती शाळेतून निघून गेल्याचे समजले. कुटुंबियांनी तिचा शोध घेतला. मात्र ती कुठेच दिसत नव्हती. अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनीही मुलीचा शोध सुरु केला.

Loading...

बुधवारी सकाळी दहा वाजता लक्ष्मण गेटजवळील झाडाझुडपात पीडित मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत आढळली. तिच्या शरीरावर जखमा होत्या. तिच्या बाजूला बीयरच्या बॉटलचे तुकडे होते. तिच्या गळ्यावर चाकूने वार करण्यात आले होते. पोलिसांनी तातडीने पीडित मुलीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने तिला इंदौरमधील रुग्णालयात हलवण्यात आले.

‘बलात्कार करणाऱ्यांनी मुलीचे अतोनात हाल केले, या मुलीच्या संपूर्ण शरिरावर जखमा असून बलात्काऱ्यांनी या मुलीचं नाक चावून तोडून टाकलं आहे, यामुळे तिच्या नाकाचे हाड तुटलं असून तिला श्वासही घेता येत नाहीये. श्वास घेण्यासाठी तिच्या नाकात एक ट्यूब टाकण्यात आली आहे. या नराधमांनी तिच्या गुप्तांगातही काठ्या घुसवल्याने तिला जबरदस्त इजा झाली आहे. या मुलीवर गुरुवारी सहा तास शस्त्रक्रीया करण्यात आली आहे’, अस डॉक्टरांनी सांगितले आहे.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपी इरफान उर्फ भय्यू याला अटक केली आहे. इरफानने नातेवाईक आजारी असल्याचे सांगत पीडित मुलीला स्वत:सोबत नेले. त्याची रवानगी पोलीस कोठडीत झाली असून या घटनेने मंदसौरमध्ये सर्वत्र संतप्त व्यक्त होत आहे.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

संज्याचं तोंड येरंडेल घेतल्यासारखं झालं असेल : निलेश राणे
दोस्ती तुटायची नाय : शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे पालिकेत भाजपचा महापौर
राणेंच्या मुख्यमंत्र्यांवरील 'त्या' टिकेला अजितदादांचे रोखठोक प्रत्युत्तर, म्हणतात...
धनंजय मुंडेंकडून पंकजा मुंडेंना पुन्हा धक्का
राष्ट्रवादीची गुंडगिरी : भाजपने केला सत्ताधारी पक्षावर हल्लाबोल
यापेक्षा अधिक लोक तर गुरूद्वारामध्ये रोज लंगरमध्ये जेवतात, तेही मोफत
सोनियाजींनी सांगितलं शिवसेनेकडून पहिलं हे लिहून घ्या की ...चव्हाणांचा खळबळजनक दावा
करोना आजार होऊ नये याकरिता दक्षता घेण्याबाबत पुणे मनपाचे आवाहन
संजय राऊत म्हणतात, महाराष्ट्रात केवळ दोनच विठ्ठल
'उद्धव ठाकरे अनुभवशून्य मुख्यमंत्री; महाराष्ट्राची वाटचाल अधोगतीकडे'