शहापूर तालुक्यात भातसा नदीत दोन तरुण बुडाले

ठाणे :  शहापूर तालुक्यातील वासिंद जवळ भातसा नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हे दोघेही अंधेरीतील रहिवासी असून अल्ताफ हुसेनअली अन्सारी आणि फरिद मयुद्दिन सय्यद अशी या दोघांची नावे आहेत. यामधील अल्ताफची मृतदेह सापडला असून फरिद अद्यापही बेपत्ता आहे. सेल्फी काढत असताना तोल गेल्यामुळे हे दोघे पाण्यात बुडाले असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुंबईतील गोदरेज महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी वासिंदमध्ये राहणाऱ्या गौरव चन्ने या मित्राकडे आले होते. बुधवारी दुपारी भातसा नदीकिनारी सात ते आठ जण फिरायला आले. यापैकी दोन तरुण पाण्यात पडून नदीच्या प्रवाहात बुडाले. कल्याण अग्निशमन दलाच्या १२ जवानांकडून शोध मोहिम सुरु करण्यात आली आहे.