दोन युवकांवर चाकुने प्राणघातक हल्ला; पैठण येथील घटना 

चाकूचा धाक

औरंगाबाद : युवकातील आपसातील विवादातुन एका युवकाने दोघा युवकांवर चाकुने हल्ला चढवत गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील हमाल गल्लीत घडली आहे. प्रेम नवगीरे असे हल्ले खोराचे नाव असून राजेंद्र सोमनाथ साळुंके व ओंकार अशोक साळुंके अशी घटनेतील जखमी तरुणांची नावे आहेत. जखमी युवकांना उपचारार्थ पैठणच्या सरकारी दवाखान्यात नेले असता दोघांना पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी दवाखान्यात पाठवण्यात आले आहे.

शहरातील हमालगल्ली येथे राजेंद्र व ओंकार हे दोन युवक अपसात गप्पा मारत उभे असतांना अचानक शेजारच्या गल्लीतील प्रेम नवगीरे या युवकाने बेसावध असलेल्या दोघा युवकांवर चाकु हल्ला करुन तेथून पळ काढला. त्यानंतर दोन्ही जखमींना उपचारासाठी पैठणच्या सरकारी दवाखान्यात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करुन त्यांना पुडील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल केले.

मागील पंधरा ते वीस दिवसापुर्वी शहरातील संत नगर येथे बाहेरील नाथमंदीर परीसरात असाच एका युवकावर चाकुने हल्ला चढवुन त्याचा गळा चिरण्याचा प्रयत्न झाला होता. हि घटना ताजी असतांनाच शहरात चाकु हल्ल्याची ही दुसरी घटना घडली आहे. या प्रकरणी पैठण पोलिसांनी तत्परता दाखवत हल्ला चढवणाऱ्या युवकाचा कसून शोध घेतला, मात्र तो सापडला नाही. लवकरच आरोपीच्या मुसक्या आवळण्यात येतील असा विश्वास पो.नि.किशोर पवार व तपास आधिकारी रामकृष्ण सागडे यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या

IMP