दोन वर्षानंतर तुकाराम मुंडे घेणार कुंभमेळ्याच्या ‘हिशोब’

टीम महाराष्ट्र देशा : दोन वर्षापूर्वी पार पडलेल्या कुंभमेळ्याच्या खर्चाचे फेर लेखापरीक्षण करण्याचे आदेश महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी दिले आहेत.

Loading...

नुकत्याच चार अधिकाऱ्यांना नोटीस आणि पाच कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याने महापालिकेत अधिकारी कर्मचारी आधीच चिंतेत असताना, कुंभमेळ्याचा जुना विषय आयुक्तांनी उकरुन काढल्याने संबंधित अधिकारी मुंडेंच्या रडारवर येण्याची शक्यता आहे.

कुंभमेळ्याच्या काळात झालेला खर्च आणि साहित्य खरेदी आवश्यक होती की अनावश्यक होती, याची चौकशी केली जाणार आहे. कुंभमेळा काळात शेकडो कोटी रुपयांचा खर्च झाल्याने त्याची तपशीलवार माहिती आयुक्त तुकाराम मुंडेंनी मागितली आहे.

आपल्या धडाकेबाज कामासाठी कायम वादग्रस्त असणारे तुकाराम मुंडे यांनी नाशिक महापालिकेचा आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून धडकेबाज निर्णयाचा सपाटा सुरूच ठेवला आहे.Loading…


Loading…

Loading...