एक विवाह ऐसा भी ; दोन महिला क्रिकेटपटू अडकल्या लग्नाच्या बेडीत !

टीम महाराष्ट्र देशा : न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू हेले जेन्सन आणि ऑस्ट्रेलियाची निकोला हॅन्कॉक यांनी लग्न केलं आहे. सध्या हेले आणि निकोला या दोन महिलांच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील प्रचंड व्हायरल होत आहेत.

क्रिकेटपटू हेले जेन्सन आणि ऑस्ट्रेलियाची निकोला हॅन्कॉक

हेले जेन्सन आणि निकोला हॅन्कॉक असे विवाह करणाऱ्या महिला क्रिकेटपटूंची नावे आहेत. हेले जेन्सन ही न्यूझीलंडची महिला क्रिकेटपटू आहे तर निकोला हॅन्कॉक ही ऑस्ट्रेलियाची महिला क्रिकेटपटू आहे.

Loading...

या दोन्ही खेळाडू ऑस्ट्रेलियात महिलांच्या बिग बॅश लीग स्पर्धेत मेलबर्न स्टार्स संघाकडून खेळत होत्या. मेलबर्न स्टार्सनेही आपल्या ट्विटर हँडलवरुन या दोघींना लग्नाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Loading...

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महिला खेळाडू लग्नबंधनात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. याआधी दक्षिण आफ्रिकेच्या डेन वेन निकर्क आणि मारिजाने कॅप यांनीही गेल्यावर्षी लग्न केलं होतं.