हात चलाखीने दोन महिलांनी सोने व्यापाऱ्याचे दागिने लांबविले

crime

औरंंगाबाद : दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफा दुकानात गेलेल्या दोन महिलांनी सोन्याचे दागिने लांबविले. ही घटना १० ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा ते सातच्या दरम्यान हडको भागात घडली.

रत्नाकर जनार्दन दहिवाल (वय ५५) यांचे हडको, एन-११ भागात अजिंक्य ज्वेलर्स आहे. त्यांच्या दुकानात नाकातील मोरणी खरेदी करण्याच्या बहाण्याने दोन महिला आल्या होत्या. त्यांना दुकानातील नोकर सोन्याची मोरणी दाखवत असताना त्याची नजर चुकवून दोघींनी हात चलाखीने पंधरा ग्रॅमची सोन्याची पोत आणि पाच ग्रॅमचे ब्रासलेट लांबवले.

सुरुवातीला दहिवल यांना घडलेला प्रकार समजलाच नाही त्यानंतर दागिने नसल्याचे लक्षात येताच, त्यांनी सिडको पोलीस ठाणे गाठले तिथे त्यांनी हकीकत सांगत. तक्रार दाखल केली. त्यानंतर याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या