अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना सरकारकडून पहिल्या टप्प्यात दोन हजार कोटी

farmer-759

टीम महाराष्ट्र देशा : राज्य सरकारने मंगळवारी अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई देण्यासाठी पहिल्या टप्प्यात दोन हजार ५९ कोटी रूपयाचा निधी मंजूर केला आहे. यात शेतीपिके व बहुवार्षिक पिके अर्थात फळबागांना मदत मंजूर केली, असून जिरायती व बागायती पिकांना सारखीच मदत दिल्याने बागायतदार शेतकऱ्यांत नाराजी आहे.

दरम्यान जिरायती व बागायती पिकांसाठी शेतीपिके म्हणून हेक्टरी आठ हजार रूपये तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रूपये भरपाई मिळणार आहे. दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंतच ही मदत मिळणार असून लवकरच ती शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा होणार आहे.

Loading...

जिल्ह्यासह राज्यात ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह फळबागांना मोठा फटका बसला. नुकसान झालेल्या पिकांचे सरकारने वेगाने पंचनामे केले. त्यानंतर ३३ टक्के व त्याहून अधिक नुकसान झालेल्या पिकांना सरकारने भरपाई मंजूर केली आहे. यात शेतीपिकांसाठी हेक्टरी आठ तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रूपये भरपाई मिळणार आहे.

नुकसानीच्या पंचनाम्यानंतर राज्यातील ३४ जिल्ह्यांतून भरपाईची मागणी करण्यात आली. त्यानुसार सरकारने मंगळवारी पहिल्या टप्प्यात दोन हजार ५९ कोटी ३६ लाख ६५ हजार रूपयाचा निधी मंजूर केला, असून भरपाईचे वाटप करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पूर्वी जिरायती, बागायती व फळबागांसाठी स्वतंत्र भरपाई देण्यात येत होती. यात जिरायती पिकांसाठी हेक्टरी सहा हजार ८०० रूपये, बागायती पिकांसाठी हेक्टरी १३ हजार ४०० रूपये तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजार रूपये भरपाई देण्यात येत होती. सरकारने जाहिर केलेल्या मदतीत जिरायती व बागायती पिकांसाठी हेक्टरी आठ हजार रूपयाप्रमाणे मदत मिळणार आहे.

पंचनाम्यानंतर दहा दिवसात सरकारने भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या हाती ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. कृषी सहायक, तलाठी व ग्रामसेवकांच्या संयुक्त स्वाक्षरीने केलेल्या पंचनाम्यानुसार मदतीचे वाटप करावे व मदतीच्या रक्कमेतून बॅंकेने कोणत्याही प्रकारची वसुली करू नये, असे आदेशही सरकारने भरपाईसाठी निधी मंजूर करताना दिले आहेत.

लातूर जिल्ह्यासाठी शंभर कोटी
अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांसाठी जिल्हा प्रशासाने सरकारकडे ३८४ कोटी रूपयाची मागणी केली, असून पहिल्या टप्प्यात मंगळवारी जिल्ह्याला शंभर कोटी 68 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. या निधीचे वाटप होईपर्यंत उर्वरित निधी येण्याची शक्यता आहे. निधी मंजूर झाल्याने भरपाईच्या वाटपाची प्रक्रिया सुरू झाली असून, हा निधी लवकरच तहसील कार्यालयाकडे वर्ग केला जाणार आहे. पूर्ण भरपाईचे एकाच वेळी की टप्प्याटप्प्याने वाटप करायचे की कसे, याबाबत सरकारकडूनच सूचनांची प्रतीक्षा असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे यांनी सांगितले.
मराठवाड्यातील जिल्ह्यांसाठी मंजूर निधी
औरंगाबाद – १२१कोटी ८१ लाख नऊ हजार,
जालना – ११० कोटी २१ लाख ९९ हजार,
बीड – १४४ कोटी १८ लाख ८३ हजार,
उस्मानाबाद – ७८ कोटी १९ लाख ५८ हजार,
-नांदेड – १२३ कोटी १४ लाख २३ हजार,
परभणी – ८७ कोटी ६२ लाख ७३ हजार,
हिंगोली – १३६ कोटी १३ लाख ९१हजार.

महत्वाच्या बातम्या 

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

कोरोना व्हायरस संदर्भात भारतीय शास्त्रज्ञांना मोठं यश
परभणीच्या 'त्या' शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांनाच केला एसएमएस, त्यांनतर जे घडले...
भारताचा 'हा' स्टार गोलंदाज पोलिसी वर्दीत करतोय कोरोनाबाबत जनजागृती
आनंदवार्ता : पुण्यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या वाढली, डॉक्टरांवर होतोय कौतुकाचा वर्षाव
काय फरक पडतो म्हणणाऱ्या राज ठाकरेंनाच बसला कोरोनाचा फटका
माझं शरीर आहे, माझी मर्जी मी माझ्या शरीरासोबत तेच करेन ! जे मला योग्य वाटतं
अभिनेते ऋषी कपूर यांची मागणी, 'संध्याकाळपुरते तरी दारुची दुकानं उघडा...'
देशातील 10 बँकांचे होणार विलीनीकरण, १ एप्रिलपासून प्रक्रियेला होणार सुरवात
फैसला ऑन दि स्पॉट , संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दादांनी दिला दिलासा
एकही केस नसणाऱ्या आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा कशाला ? : निलेश राणे