fbpx

तो दहशतवादी होता दहावीचा विद्यार्थी ; वडील जम्मू-काश्मीर पोलिसात

टीम महाराष्ट्र देशा: जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रावर झालेला दहशतवादी हल्ला हा स्थानिक तरुणांनी केला आहे. यात मारल्या गेलेल्या दोन अतिरेक्यांपैकी एक अतिरेकी हा दहावी मध्ये शिकत होता. त्याच वय अवघ १६ होत फरदीन अहमद खांदय असं या दहशतवाद्याचं नाव असून त्याचे वडील जम्मू-काश्मीर पोलिसात शिपाई म्हणून कार्यरत असल्याची माहिती येत आहे.

रविवारी पहाटे २.३० वाजता सीआरपीएफ कँम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात ५ जवान शहीद झाले होते. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या कारवाईत दोन अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यात आले होते.