पालघर बॉम्ब साठा प्रकरण; पुण्यातून आणखी दोघांना अटक

पुणे : पालघर जिल्ह्यातील भंडारआळी परिसरात एका बंगल्यात एटीएसच्या पथकाने काल छापा मारला होता. या छाप्यामध्ये तब्बल २० देशी बॉम्ब आणि २ जिलेटीन सापडले होते. या प्रकरणी संशयित आरोपी वैभव राऊत, शरद कळस्कर आणि सुधन्वा गोंधळेकर यांना अटक करण्यात आली होती.

दरम्यान आज दुसऱ्या दिवशी देखील याप्रकरणी पोलिसांची धडपकड सुरुच असून, दहशतवादविरोधी पथकाने आणखी दोघांना पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं आहे. मात्र अद्याप त्यांची नावं समोर आलेली नाहीयेत.

वैभव राऊत याच्या घरातून आणि दुकानातून २० गावठी बॉम्ब, स्फोटके आणि बॉम्ब बनविण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. राज्याच्या विविध भागांत घातपात घडविण्याचा या टोळीचा कट होता, असा पोलिसांचा दावा आहे.

औरंगाबाद तोडफोड प्रकरणी सीआईडी चौकशी करा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

मराठा आंदोलकांनी नाही तर बाहेरच्यांनी चाकण पेटवले ?

You might also like
Comments
Loading...