एकाच नाण्याच्या दोन बाजू पण एकमेकांचे वैरी?

modi-togadia

टीम महाराष्ट देशा: विश्व हिंदू परिषदचे नेते प्रवीण तोगडिया यांनी, मोदी सरकारवर माझा आवाज दाबत असून माझ्या एन्काऊंटर चा डाव होता. असा धक्कादायक आरोप केला आहे. त्यामुळे चांगलाच राजकीय गोंधळ उडाला असून उलट सुलट राजकीय चर्चेला उधान आले.

Loading...

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रवीण तोगडिया ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मात्र या दोघांमध्ये गेल्या १५ वर्षापासून कटुता असल्याची राजकीय चर्चा होत आहे. एका स्कूटरवर फिरणाऱ्या दोघांमध्ये नरेंद्र मोदी २००२ मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर हे एकमेकांचे वैरी झाले. ‘तोगडिया आणि विश्व हिंदू परिषद सरकारच्या कारभारात हस्तक्षेप करणार नाही’, असे त्यावेळी मोदींनी स्पष्ट केले होते. त्यामुळेच हा दुरावा निर्माण झाला असं सांगण्यात येतं.

तेव्हापासून हे  दोन मित्र एकमेकांचे विरोधक झाल्याचे समजते. सत्ता हाती आल्यानंतर मोदींनी बाजूला सारल्याने तोगडिया नाराज झाले होते. त्यानंतर विकासाच्या मुद्द्यावरून गुजरातच्या अहमदाबादमध्ये मंदिर पाडल्यानंतर हा वाद अधिकच वाढला. यामुळे दोघांच्या संबंधात आणखी दुरावा निर्माण झाला. तसेच पाकिस्तानचे निर्माता मोहम्मद अली जिन्ना यांच्यावर भाजपचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण आडवाणी यांनी वक्तव्य स्तुतिसुमने उधळली होती. त्यामुळे विहंपच्या कार्यकर्त्यांनी राज्यात निदर्शन केले होते. या निदर्शनांवर गुजरात सरकारने अत्यंत कडक कारवाई केली.Loading…


Loading…

Loading...