दुचाकीस्वाराकडून 2 गावठी कट्टे व काडतूसे जप्त; पारनेर पोलीसांची कामगिरी

पारनेर / स्वप्नील भालेराव : पारनेर तालुक्यातील गुणोरे परिसरात प्रताप मंजाबा साळुंखे या इसमाकडून 2 गावठी कट्टे व चार काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. या कामी निघोज दुरक्षेत्रचे पोलीस हेडकाँस्टेंबल अशोक निकम व शिवाजी कावडे यांनी कोहकडी येथील ग्रामस्थांच्या मदतीने ही कामगिरी पार पाडली आहे. यासाठी पिएसआय संजय मातोडकर, पवार, भिंगारदिवे, आव्हाड, कावडे, भावसे, देवढे, दिवटे या सर्व पोलिसांनी या यशस्वी कामगीरीत महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

Loading...

सविस्तर माहिती अशी की, प्रताप मंजाबा साळुंखे हा दूचाकी वर गुणोरे परिसरातून प्रवास करत असताना समोरून येणाऱ्या रतिराम बाबुराव डेरंगे रा. कूरूंद या व्यक्तीस दूचाकी वरून धडक दिली. व प्रताप साळुंखे याने तेथुन पलायन करण्याचा प्रयत्नात निघोज येथील काही पोलीस कर्मचाऱ्यांनी त्याचा पाठलाग करून त्याच्या कडून 2 गावठी कट्टे व काडतूसे अशा वस्तू हस्तगत केल्या व त्यास पारनेर पोलीसांनी अटक केली आहे.

जखमी रतिराम बाबूराव डेरंगे यास शिरूर येथील माणिकचंद धारिवाल रूग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्याचाही उपचारादरम्यान मृत्यु झाल्याची माहीती पारनेर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संजय मातोडकर यांनी दिली. शवविच्छेदनानंतर सदर मृतदेह नातेवाईकांकडे सफूर्त करण्यात येईल. तत्पूर्वी प्रताप मंजाबा साळुंखे कोण याच्याकडे अवैध शस्त्रे कशी आली व या मयत रतिराम डेरंगे बाबत पारनेर पोलीस नेमकी आरोपी विरूद्ध काय कायदेशीर कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...