रिक्षातून गांजाची वाहतूक करणारे दोघे गुन्हेशाखेच्या जाळ्यात, २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

रिक्षातून गांजाची वाहतूक करणारे दोघे गुन्हेशाखेच्या जाळ्यात, २ लाख ८५ हजारांचा मुद्देमाल जप्त

औरंंगाबाद : रिक्षातून गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना गुन्हेशाखा पोलिसांनी सापळा रचून दौलताबाद परिसरात गजाआड केले. दोघांच्या ताब्यातून एक रिक्षा, दोन मोबाईल, रोख रक्कम, १९ किलो ९० ग्रँम गांजा असा एकूण २ लाख ८५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे यांनी दिली.

दौलताबाद परिसरातील ओंकारेश्वर हॉटेलजवळ रिक्षातून गांजाची वाहतूक करणारे दोन जण येणार असल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली होती. गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त रविंद्र साळोखे, पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मनोज शिंदे, पोलिस अंमलदार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, विशाल पाटील, आनंद वाहुळ, विरेश बने, वाहनचालक सहाय्यक फौजदार गायकवाड आदींच्या पथकाने सापळा रचला.

त्यानंतर रिक्षाक्रमांक (एमएच-२०-४१८१) अडवला. पोलिसांनी रिक्षातील देविदास रामा मोहिते (वय ३२), काकासाहेब साळूबा जंजाळ (वय २४) दोघे रा.शिवना.ता.सिल्लोड या दोघांना ताब्यात घेतले. पोलिसांनी रिक्षाची झडती घेतली असता त्यामध्ये दहा गोण्यांमध्ये लपवून ठेवलेला १७.९० ग्रॅम गांजा मिळून आला. या प्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या