कोल्हापूरात बनावट नोटा छापणाऱ्या दोन जणांना अटक

कोल्हापूर  (हिं.स.) : बनावट नोटा छापून त्या बाजारात व्यवहारासाठी आणणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी अटक केले. त्यांच्याकडून सुमारे २ लाख ४९ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. विश्‍वास आण्णापा कोळी (२७) आणि जमीर अब्दुलकादर पटेल (३२) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून ते शिरोळा येथीलर हिवासी आहेत.