नाशिकच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पदक

नाशिक : नाशिक शहर पोलिसांतील दोन अधिकाऱ्यांना कर्तव्य बजावताना उकृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. यात अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड आणि नाशिक शहर विशेष शाखेच्या सहायक उपनिरीक्षक मुजफ्फर अन्वर सय्यद अशी अधिकाऱ्यांची नावे आहेत. उद्या स्वातंत्र्यंदिनी नवी दिल्ली येथे राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांना हे पदक प्रदान करण्यात येणार आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Comments
Loading...