यवतमाळ व पुसद येथे युवकांची हत्या.

mother,son,attack,sangali

यवतमाळ(संदेश कान्हु,यवतमाळ )- शहरातील पाटीपुरा परिसरात एका सव्वीस वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने हत्या करणात आली आहे.३१ रोजी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास  अनिल उर्फ हनीसिंग विजय थूल वय २६ वर्षे राहणार पाटीपुरा यांची काही अज्ञात व्यक्तींनी हत्या केली. तर दुसऱ्या घटनेत पुसद येथील धनकेश्वर नगर येथे नाल्यात चिखलात युवकाचा मृतदेह आढळून आला. सदर घटनेची माहिती वसंत नगर पोलिसांना देण्यात आली. सदर युवक हा हिमायत नगर येथील असून तो सध्या पुसदच्या शिवाजी वार्ड येथे राहत होता. प्रेमकुमार ठाकरे असे मृतकाचे नाव आहे . जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खून झाल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे .या दोन्ही हत्यांचे कारण आद्यप काळाले नाही.