‘कोयना’वर आणखी दोन जलविद्युत प्रकल्प

Two more hydropower projects on 'Koyna'

पुणे : कोयना धरणाच्या पायथ्याशी 40 मेगावॅट क्षमतेचे दोन जलविद्युत प्रकल्प उभारले जाणार आहेत. या जलविद्युत प्रकल्प `बांधा वापरा हस्तांतरित करा’ (बीओटी) या तत्वावर पूर्ण करण्यात येणार आहे. मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाचे काम मार्गी लागणार असून राज्याला 80 मेगावॅट इतकी वीज उपलब्ध होणार आहे.

कोयना धरण पायथा विद्युतगृह येथे 40 मेगावॉट क्षमतेचे दोन जलविद्युत प्रकल्प उभारण्याचे नियोजन आघाडी सरकारच्या काळापासून सुरू आहे. मुळात या लघु जलविद्युत निर्मिती केंद्रांची कामे 2014 मध्येच पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, या ना त्या कारणामुळे या प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण झाले नाही. आता शासनाने यामध्ये लक्ष घातले आहे. त्यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन, राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या उपस्थितीत जुलैमध्ये बैठक झाली होती.

Loading...

या बैठकीत कोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर) येथे 40 मेगावॅट क्षमतेचे दोन जलविद्युत प्रकल्पावर शासनामार्फत गुंतवणूक न करता बीओटी तत्वावर करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यनुसार हा जलविद्युत प्रकल्प बीओटी तत्वावर पूर्ण करण्याकरिता, बीओटी प्रस्ताव व संबंधीत निविदा प्रक्रिया जलद गतीने पार पाडण्याकरिता एका कृतीगटाचे गठण करण्यासंबंधीची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

त्यानुसार शासनाने यासंबंधीची निविदा प्रक्रिया व कंत्राटाबाबत ठोस कार्यवाही करण्याकरिता मुख्य अभियंता (स्थापत्य) यांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची समिती स्थापन केली आहे. या कृती गटाने कोयना धरण पायथा विद्युतगृह (डावा तीर) जलविद्युत प्रकल्पांची सद्य:स्थितीत झालेल्या कामाच्या अनुषंगाने उर्वरित कामे पूर्ण करण्याकरिता सदर प्रकल्प विकसित करताना संभाव्य पर्यायांचा अभ्यास करून त्याची व्याप्ती ठरवावी. प्रचलित बीओटी मॉडेलनुसार निविदा पध्दत, प्रक्रिया ठरवणे, निविदासंबंधी दस्ताऐवज तयार करणे.

सदर बीओटी प्रस्ताव सादर करणे व निविदा प्रक्रिया राबविण्याबाबतची कार्यवाही कालबध्द पध्दतीने यशस्वी करण्यासंबंधी ठोस नियोजन करणे. त्याचबरोबर या कृती गटाने ही सर्व कार्यवाही दोन महिन्यांमध्ये पूर्ण करण्याच्या सूचनाही शासनाने दिल्या आहेत.

Loading...
Loading...
Loading…
Top Posts

मनसेच्या रणरागिणीचं तृप्ती देसाईंना खुले आव्हान, तू येच...
कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकऱ्यांची यादी आता 'या' दिवशी जाहीर होणार
...त्यामुळे मी मोठ्या मनाने माफी मागते - तृप्ती देसाई
'पाच वर्षे सत्तेत राहून पराभव झाला मात्र, मी पराभूत झाल्याचा सर्वात जास्त आनंद माझ्या मुलाला झाला'
महाविकास आघाडीचे 'जनक देवेंद्र फडणवीस' आहेत : शिवाजीराव आढळराव पाटील
इंदुरीकर-देसाई वादात आता 'भोर' महाराजांची ऊडी ; देसाईंना कापून टाकण्याची धमकी
...अन्यथा इंदोरीकरांच्या तोंडाला काळं फासू; असा इशारा देणाऱ्या तृप्ती देसाईंवर मनसेच्या रणरागिणीचा प्रतिइशारा
गोपीनाथ मुंडेंच्या आग्रहाला 'बळी' पडलो; मोदींवर विश्वास ठेवला, मात्र घडलं 'भलतंच'
कुख्यात चंदन तस्कर वीरप्पनच्या मुलीचा भाजपमध्ये प्रवेश
यापुढे मी इंदुरीकरांना महाराज म्हणणार नाही - तृप्ती देसाई