fbpx

कुमारस्वामी सरकारमधील दोन आमदारांनी काढला पाठिंबा

कर्नाटक : कर्नाटक राज्यातील कुमारस्वामी सरकारमधील एच. नागेश आणि आर. शंकर या दोन अपक्ष आमदारांनी राज्य सरकारचा पाठींबा काढून घेतला आहे. त्यामुळे सरकारला मोठा हादरा बसला असून दोन दिवसांपासून सुरु असलेल्या सरकार कोसळण्याच्या चर्चेतील हा ट्रेलर असल्याचे बोलले जात आहे.

मंगळवारी या दोन आमदारांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे लिखीत स्वरुपात सोपवला आहे. “कर्नाटकातील काँग्रेस आणि जेडीएस यांच्या युती सरकारमधून आम्ही ताबडतोब बाहेर पडत आहोत. त्यामुळे आपण आमच्या राजीनाम्यावर तत्काळ कार्यवाही करावी, असे या दोन्ही आमदारांनी राज्यपालांकडे पाठवलेल्या आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे.”

आमदार एच. नागेश म्हणाले, एका चांगल्या आणि स्थिर सरकारसाठी मी कर्नाटकतील युती सरकारला पाठिंबा दिला होता. मात्र, यामध्ये सरकार अपयशी ठरले आहे. काँग्रेस आणि जेडीएस या दोन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. त्यामुळे स्थिर सरकार स्थापण्यासाठी मी भाजपासोबत जाण्याचे ठरवले आहे.