fbpx

दिल्लीत दोन आमदारांच्या मुलांचे सरकारी शाळेत प्रवेश!

टीम महाराष्ट्र देशा : आमदार , खासदारांच्या मुलांना सक्तीने या सरकारी शाळात पाठवायला पाहिजे म्हणजे यांना अक्कल येईल, असे अनेक वर्षे अनेक जण उपरोधाने, उद्विग्नतेने म्हणत आले आहेत. परंतु असे खरेच घडू शकते? हो !! दिल्लीत दोन आमदारांची मुले आता सरकारी शाळेत जात आहेत !! हा सोबतचा फोटो म्हणूनच ऐतिहासिक आणि महत्वाचा आहे. एकीकडे उच्च दर्जासाठी खाजगी शाळा हव्या असतात आणि सरकारही आपली जबाबदारी झटकून मोकळे होत असते.

महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारही याला अपवाद नाही. पण दिल्लीत आप सरकार काहीतरी वेगळे घडवते आहे. परवा जोगाबाई सरकारी शाळेत,ओखला दिल्ली येथील आमदार अमानतुल्ला यांच्या मुलाने नववीत आणि मुलीने सहावीत प्रवेश घेतला आहे.यापूर्वी ते खाजगी कॉन्वेंटमध्ये शिकत होते. पक्षाचे दुसरे आमदार गुलाब सिंघ यांचीही मुले गेल्या वर्षापासून सरकारी शाळेत जात आहेत.गेल्या ३ वर्षात सरकारी शाळामधील पायाभूत सोईसुविधा मध्ये म्हणजे वर्ग, मैदान,तलाव, स्वच्छतागृहे यात बदल झालाच आहे पण शैक्षणिक दर्जामध्ये सुद्धा खूप सुधारणा झाली आहे.

महाराष्ट्रात सरकारी शाळा बंद केल्या जाण्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सरकारी शाळांमधील सुधारणा, ८००० नवीन वर्ग ,अत्याधुनिक क्रीडांगणे अश्या सुविधा लक्षणीय आहेत.

मी गृहमंत्री असतो तर ‘त्यांना’ गोळ्या घातल्या असत्या ; भाजप आमदाराचे मुक्ताफळे

राज्याच्या प्रशासनात बोगस लोकं कामाला लागलेत- अजित पवार