‘बदल्या रद्द करण्यासाठी दोन मंत्र्यांनी ४० कोटींची लाच स्वीकारली’, वाझेंचा आरोप

sachin VAZE

मुंबई : सचिन वाझे प्रकरणातून आता अनेक खुलासे बाहेर येत आहेत. राज्यातील दोन मंत्र्यांनी ४० कोटींची लाच स्वीकारल्याचा आरोप सचिन वाझे यांनी इडीकडे नुकताच केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाझेंना बारमधून १०० कोटी रुपये गोळा करण्यास सांगितल्याचा वाझेंवर आरोप असून सध्या सचिन वाझे ईडीच्या ताब्यात आहेत.

गृहमंत्री असताना देशमुख यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत निलंबित एपीआय सचीन वाझे यांना मुंबईतील बारमधून १०० कोटी रुपये वसूल करायला सांगितले होते. त्यापैकी वाझे यांने ४.७० कोटी वसूल केले. हे पैसे वसूलीसाठी देशमुख यांच्या नागपूर येथिल श्री साई शिक्षण संस्थेचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर देशमुख यांच्यावरील अनेक आरोप उघड होत आहेत.

अटकेत असलेला एपीआय सचिन वाझे ईडीला दिलेल्या निवेदनात म्हणाला की, राज्याचे परिवहनमंत्री व शिवसेना नेते अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसच पक्षाचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी १0 उपायुक्तांच्या बदल्या रद्द करण्यासाठी प्रत्येकी २० कोटींची लाच स्वीकारली होती. जुलै २०२१ मध्ये हा गैरव्यवहार झाल्याचे सचिन वाझेंनी ईडीला दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. हे पैसे देशमुख यांना संजीव पलांडे (अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव), बजरंग खरमाटे (आरटीओ) यांच्या मार्फत देण्यात आल्याचेही म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी इडीने खरमाटे यांचे मत नोंदविले होते. आपली बाजू मांडण्यासाठी त्यांनी दोन आठवड्याची मुदत मागितली होती. आता कधीही इडी खरमाटे यांना चौकशीसाठी बोलवू शकते. सीबीआयतर्फे नोंदविण्यात आलेल्या एफआयआरच्या अधारे ईडी मनी लाँडरिंग प्रकरणाचा तपास करत आहे. या प्रकरणात अनेक खुलासे समोर येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या