औरंगाबादेत दोन लाखांची अवैध देशी दारु जप्त!

औरंगाबाद: ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये शेतमाल आहे असे भासवून लॉकडाउन मध्ये १८ बॉक्स देशी दारु विक्री करीता घेवून जाणाऱ्या आरोपीला   दोन लाख ४४ हजार रुपयांची देशी दारु व ट्रॅक्टर ट्रॉली या मुद्देमाला अटक करण्यात आले. मंगळवारी गुन्हे शाखेस मिळालेल्या गुप्त बातमीवरुन एक ईसम झाल्टा फाटा ते चिकलटाणा येणारे रोडने ट्रक्टरमध्ये शेतमाल आहे, असे भासवुन कडबा खाली लपवुन अवैधरेत्या देशी दारुची बेकायदेशीररित्या विक्रीच्या उद्देशाने चोरटी वाहतुक करीत असुन सदर ट्रक्टरचे ट्राली मध्ये कडव्याच्या खाली देशी दारुचे बॉक्स आहे. अशी माहिती मिळाल्यावर कारवाई करण्यात आली.

सदर देशी दारुच्या बॉक्स सोबत ठेवण्याचा व विक्री करण्याचा, वाहतुक करण्याचा परवाना आहे का अशी विचारणा केली, असता त्याने देशी दारुचे बॉक्स हे मागून वरुन येणारे जगन्नाथ एकनाथ जोशी, रा. मुकुंदनगर, मारोती मंदीराजवळ, औरंगाबाद याचे असल्याचे सांगितले. जगन्नाथ एकनाथ जोशी याला ताब्यात घेऊन खाकी दाखवताच, ट्रक्टर माझे मालकीचे असुन देशी दारुचे बॉक्स हे महीला नामे सुमनबाई पिराजी गायकवाड हिच्या मालकीचे असल्याची कबुली दिली.

यावेळी पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेतले व अधिक तपास करीत आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, उप-आयुक्त मिना मकवाना, मा. सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे. रविंद्र साळोखे,अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शन खाली कारवाई करण्यात आली. मनोज शिंदे, संतोष सोनवणे. चंद्रकांत गवळी, रितेश जाधव, विशाल पाटील, आनंद वाहुळ यांनी कारवाई केली.

महत्वाच्या बातम्या