fbpx

केरळच्या दोन महिलांचा शबरीमाला मंदिरात प्रवेश

टीम महाराष्ट्र देशा : शबरीमाला मंदिरात अखेर महिलांनी प्रवेश केल्याची घटना समोर आली आहे. केरळच्या दोन महिलांनी पहाटे साडेतीन वाजता मंदिरात प्रवेश करून भगवान अयप्पाचं दर्शन घेतल्याचा दावा केला आहे. बिंदू आणि कनकदुर्गा या ४० वर्षाच्या आतल्या महिलांनी भगवान आयप्पा चे दर्शन घेतले व त्याबाबतची माहिती त्यांनी तेथील स्थानिक वृत्तवाहिनीला दिली.

या दोन महिलांनी पोलिसांच्या मदतीने पहाटे साडेतीन वाजता मंदिरात प्रवेश केला. भगवान आय्पाचे दर्शन घेतले त्यानंतर सुरक्षेच्या कारणामुळे दर्शन घेतल्यानंतर या दोन्ही महिला कुठे गेल्या याची माहिती देण्यात आलेली नाही.

शबरीमाला मंदिरात 10 ते 50 वर्ष वयोगटातल्या महिलांना प्रवेश वर्ज असल्याने कोणत्याही महिलेने मंदिरात प्रवेश केलेला नाही. सुप्रीम कोर्टाने महिला प्रवेश बंदी उठवली असून या मंदिरात अद्याप महिलांना प्रवेश मिळालेला नाही.