औरंंगाबाद : शहराच्या विविध भागात शुक्रवारी (दि.१२) दुपारी आगीच्या दोन घटना घडल्या. या दोन्ही घटनांमध्ये कोणतीही जीवीत हानी झाली नसल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सुत्रांनी दिली आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात असलेल्या औरंगाबाद लेणीजवळ असलेल्या टेकडीवरील वाळलेल्या गवताला शुक्रवारी दुपारी अचानकपणे आग लागली. पाहता-पाहात आगीने टेकडीवरील गवताला आपल्या कावेत घेतले होते. टेकडीवरील गवताला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या कर्मचाNयांनी घटनास्थळी धाव घेवून आगीवर नियंत्रण मिळविले.
दुसNया घटनेत, बीड बायपास रोडवरील दरिया हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकला शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास अचानकपणे आग लागली. या आगीत ट्रकची वॅâबीन जळाली असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या सुत्रांनी दिली आहे. अग्निशमन दलाच्या कर्मचाNयांनी वेळीच धाव घेत ट्रकला लागलेली आग विझवली. ट्रकला लागलेल्या आगीमुळे बीड बायपासवरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या दोन्ही घटनांची नोंद अनुक्रमे बेगमपुरा आणि सातारा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
- राज्याच्या जनतेला महाविकासआघाडी हा एक त्रास झाला आहे – नितेश राणे
- विद्यार्थ्यांना अटक करणाऱ्या पोलिसांना अनिल बोंडे म्हणाले ‘तुम्ही तर सरकारचे कुत्रे’
- शिवसेनेच्या माजी खासदाराविरोधात शिवराळ भाषेत पोस्ट; अमोल कोल्हेंच्या भावावर गुन्हा दाखल
- ‘मुख्यमंत्र्यांसाठी मी आमदारकी पणाला लावली; आता संजय राठोडांच्या जागी मला मंत्री करा’
- #MPSC : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पो. नि. चोरमाले यांना तात्काळ निलंबित करा