शरीर एकच मात्र तोंडं दोन; सोलापूरमध्ये जन्मले बाळ

सोलापूर: शरीर एकच मात्र दोन तोंडे असणारे बाळ सोलापूरमध्ये जन्माले आले आहे. सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात अर्थात सिव्हील हॉस्पिटलमध्ये या बाळाचा झालाय. विशिष्ट शरीररचना असलेल्या बाळाचा जन्म म्हणजे लाखात एक मानला जातो.

सोलापूरमधील विडी घरकुल परीसरातील महिलेला प्रसूतीसाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. यावेळी सोनोग्राफीमध्ये दोन तोंड मात्र एकच शरीर असणारे बाळ आढळल्याने डॉक्टरांनी याची कल्पना कुटुंबियांना दिली होती. सयामी जुळे बाळाचा जन्म म्हणजे लाखातील एक गोष्ट मानली जाते. दोन तोंडं, दोन अन्ननलिका, दोन श्‍वसननलिका असलेल्या बाळाला शरीर मात्र एकच आहे. तर वजन तीन किलो नऊशे ग्रॅम आहे. बाळाच्या कुटुंबीयांची ओळख सिव्हिल प्रशासनाने गुप्त ठेवली आहे.