एक शरीर, दोन तोंडं; बीडमध्ये सयामी जुळ्यांचा जन्म

ambajogai 1

बीड: अंबाजोगाईत काल एक अनोखी घटना पाहायला मिळाली  येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयाच्या काल दोन तोंड असलेल एक बाळ जन्मास आल आहे. काल रात्री प्रसुती विभागात परळी तालुक्यातील एक महिला बाळंतपणासाठी दाखल झाली होती. तीच्यावर उपचार करतांना आणि तीची पुर्वीची कागदपत्रे तपासतांना तीच्या पोटातील बाळ ॲबनॉर्मल आहे हे लक्षात आले. त्यामुळे  डॉ. संजय बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी या महिलेवर तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. महिलेचे सीझर करुन बाळाला बाहेर काढले असता बाळाला दोन तोंड असल्याचे लक्षात आले. या बाळाचे वजन ३ किलो ७०० ग्रँम असून बाळ आणि बाळाच्या आईची प्रकृती सध्या चांगली असली तरी बाळाच्या संपुर्ण हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्यावर शिशू अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

Loading...

या ॲबनॉर्मल बाळाला दोन डोके, दोन किडणी आणि दोन फुफुसे आहेत. या वैद्यकीय महाविद्यालयात याआधी देखील अशीच घटना या रुग्णालयात घडली होती तेव्हा मात्र ते बाळ लगेच मृत झाले होते. या घटनेबाबत डॉ. संजय बनसोडे म्हणाले ‘अशा ॲबनॉर्मल बाळाच्या आयुष्याबद्दल खात्रीशीर काहीही सांगता येत नाही. असे असले  तरीही अशी ॲबनॉर्मल बाळे अनेकवर्षे जगत असल्याचीही अनेक उदाहरणे वैद्यकीय शास्त्र अभ्यासात आढळून आले आहे.’

3 Comments

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...