काश्मीरमध्ये हरकत-उल-मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना अटक

जम्मू : सुरक्षा दलाने आज जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंदवाडा भागातून हरकत-उल-मुजाहिद्दीनच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली. शोध मोहिमेदरम्यान या दोन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने अटक केली. हंदवाडा पोलीस, २१ राष्ट्रीय रायफल्स आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाने ही कारवाई केली. युनूस अहमद मीर आणि ताहिर-उल- इस्लाम अशी अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत.

Comments
Loading...