चंद्रपुरात दोन जहाल नक्षल्यांना अटक

गडचिरोली- चंद्रपूर पोलिसांनी नक्षल चळवळीला जबर हादरा देत दोन जहाल नक्षलींना अटक केली आहे. यामध्ये स्पेशल झोनल कमेटी मेंबरसह एका महिला नक्षलीस पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. रामन्ना आणि पद्मा अशी यांची नावं असून त्यांना गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसात चार नक्षली पोलिसांच्या जाळ्यात अडकल्यामुळे नक्षल चळवळीला हा मोठा धक्का असल्याचे बोलल्या जात आहे.

दोन्ही जहाल नक्षलींना चंद्रपूर पोलिसांनी बल्लारपूर रेल्वे स्थानकावरून अटक केली. रामन्ना हा दंडकारण्य स्पेशल झोनल कमेटी सदस्य असून त्याच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस जाहिर आहे. तर पद्मा ही एरिया कमेटी मेम्बर असून तिच्यावर ६ लाखांचे बक्षीस आहे. हे दोन्ही नक्षली लाहेरी पोलिस स्टेशनचे ‘वॉन्टेड’ आहेत. त्यामुळं अटक केल्यानंतर त्यांना लगेच गडचिरोली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. पुढील तपस गचिरोली पोलीस करीत आहे.

Comments
Loading...