fbpx

दोन गुजराती चोर देशाला मूर्ख बनवत आहेत, भाजप नेत्यानेच डागली तोफ

amit shah and pm narendra modi

टीम महाराष्ट्र देशा: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये टीकेची झोड उठली आहे. राफेल करारावरून कॉग्रेस अध्यक्ष राहुल गांधी ‘चौकीदार चोर है’ म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधत आहे. तर आत खुद्द एका भाजप नेत्यानेच ‘दोन गुजराती चोर हिंदी पट्यातील नागरिकांना मूर्ख बनवत आहेत’, अशी टीका केली आहे. आय. पी. सिंह असे या भाजप नेत्यांचे नाव असून सध्या भाजपमधून त्यांना निलंबित करण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेशच्या लखनऊचे असणारे आय पी सिंह यांनी ट्विटरवरून भाजप नेतृत्वावर कडाडून टीका केली आहे. पाच वर्षाखाली देशाने आपण प्रधानमंत्री निवडला आहे की प्रचारमंत्री, पंतप्रधान टी-शर्ट आणि चहाचे कप विकतो. हे कितपत चांगलं वाटतं?, असा प्रश्न देखील सिंह यांनी उपस्थित केला आहे. केवळ टी-शर्ट आणि मिस्ड कॉल देऊन कार्यकर्ते तयार होत नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

एकाबाजूला सर्व भाजपनेते आपल्या नावापुढे ‘चौकीदार’ लावत असताना सिंह यांनी मात्र आपल्या नावापुढे ‘उसुलदार’ लावले आहे. दरम्यान, मी माझ्या आयुष्यातील तीन दशकं पक्षासाठी दिली आहेत. मात्र नेतृत्वाबद्दल खरं बोलन गुन्हा मानला जात असेल, तर पक्षातील लोकशाही संपली, म्हणत सिंह यांनी आपली भावना व्यक्त केली आहे.