राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्यातील विधानसभेचे दोन उमेदवार ठरले

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेसने विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली आहे. पक्षात पारदर्शक पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाणार असून याचाच एक भाग म्हणून ही निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या मंडळींना अर्ज करण्यास सांगण्यात आले होते.

राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नेत्यांनी अर्ज केले असून बारामती आणि आंबेगाव विधानसभा हे दोन मतदारसंघ वगळता सर्वत्र तीन किंवा त्यापेक्षा अधिक अर्ज आले आहेत. बारामतीत अजित पवार तर आंबेगावात दिलीप वळसे पाटील यांचाच फक्त पक्षाकडे अर्ज आला आहे. या मतदार संघातून उमेदवारी मागण्याची कुणीही हिम्मत न केल्यामुळे या दोघांची उमेदवारी आताच निश्चित झाली आहे.