मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याआधी सीएसकेला दोन मोठे धक्के

csk

नवी दिल्ली : आयपीएल 2021 चा दुसरा भाग यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या दिवशीचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होणार आहे. परंतु त्याआधीच या लीगच्या फ्रँचाइझींना मोठे धक्के बसत आहे. स्थगित आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यातून काही खेळाडू माघार घेत आहेत तर काही खेळाडू दुखापतीमुळे आयपीएलमध्ये सहभागी होऊ शकत नाहीत.

आतापर्यंत पंजाब किंग्ज, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद या फ्रँचाइझींच्या खेळाडूंनी अचानक माघार या लीगमधून माघार घेतल्याने धक्का बसला तर चेन्नई सुपर किंग्जला फाफ डु प्‍लेसीच्या रूपाने एक धक्का बसला आहे.

सीपीएल 2021 च्या उपांत्यपूर्व सामन्यापूर्वी फाफ डु प्लेसिसला दुखापत झाली होती. त्याच्या मांडीच्या स्नायूंमध्ये ताण होता, ज्यामुळे त्याला त्या सामन्यातूनही बाहेर पडावे लागले. त्यामुळे आता आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यात त्याच्या खेळण्यावर साशंकता आहे.

तर दुसरा धक्का सॅम कुरनच्या रूपाने बसला आहे. क्वारंटाईन नियमांमुळे तो सामन्यातून बाहेर पडला आहे. सॅम कुरन नुकताच यूएईला पोहचला आहे आणि आता त्याला 6 दिवस क्वारंटाईन राहावे लागणार आहे. अशा स्थितीत तो सुरुवातीच्या मुंबई इंडियन्सविरुद्ध सामन्यासाठी उपलब्ध राहणार नाही.

महत्त्वाच्या बातम्या