गोव्यातून स्वस्तात दारू विकत आणून पुण्यात महागड्या किमतीत विकणाऱ्या दोघांना अटक 

waine

पुणे : गोव्यातून स्वस्त किमतीत दारू विकत आणून ती पुण्यात महागड्या किमतीत विकणाऱ्या दोघांना कोथरूड पोलिसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून 1116 विदेशी दारूच्या बाटल्यासह सात लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.गोविंद पुखराज कुमावत (रा. वारजे) आणि अमित विठ्ठल राऊत (रा. कोथरूड) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

आरोपी गोविंद कुमावत याने गोव्यात तयार केलेली दारू बेकायदेशीररीत्या पुण्यात आणली होती. त्यानंतर साथीदार अमित राऊत त्याच्या मदतीने तो त्यावरील गोव्यातील लेबल काढून ते जास्त दराने पुणे शहरात विकत होता. सुरुवातीला पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली. त्याने चौकशीत दिलेल्या माहितीनुसार कोथरूड परिसरातील न्यू डीपी रस्ता येथे एका टेम्पोत ठेवलेला मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून एक तीन चाकी टेम्पो, एक चारचाकी टेम्पो, 1116 विदेशी दारूच्या बाटल्या, आणि वेगवेगळ्या कंपन्यांचे बनावट स्टिकर असा एकूण सात लाख अकरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या