फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांच्या थोबाडीत मारल्याप्रकरणी दोघांना अटक

macron

पॅरीस – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष ईमान्युएल मॅक्रोन यांच्या गालावर एका अज्ञात इसमानं थप्पड मारल्याची घटना काल घडली. यामागचा हेतू स्पष्ट झालेला नाही. दक्षिण फ्रान्समध्ये कामकाजाच्या भेट देण्यासाठी अध्यक्ष आले असता ही घटना घडली. यासंदर्भात दोन संशयीतांना पोलिसांनी अटक केली आहे.

फ्रांसच्या राजकीय वर्तुळातून या घटने बद्दल निषेध व्यक्त केला जात आहे. दरम्यान फ्रांसमध्ये रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय मागे घेतला गेला असून, सात महिन्यांपासून बंद असलेली हॉटेल्सही पुन्हा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बीएफएम टीव्ही आणि आरएमसीने ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये दिसतंय की हिरव्या रंगाचा टी-शर्ट आणि मास्क घातलेल्या इसमाने राष्ट्राध्यक्षासमोर हस्तांदोलनासाठी हात पुढे केला. राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन जवळ येताच त्याने त्यांना चापट लगावली. या घटनेनंतर मॅक्रॉन यांच्या सुरक्षेत आणखी वाढ करण्यात आली आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP