संरक्षणमंत्र्यांच्या हत्येचा कट, व्हॉट्सअॅप ग्रुपवर चॅटिंग करणारे दोघे ताब्यात

Nirmala-Sitharaman-

टीम महाराष्ट्र देशा- संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या हत्येचा कट रचण्यासंदर्भात व्हॉट्सअॅप ग्रुपवर चॅटिंग करणाऱ्या दोन जणांच्या उत्तराखंड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. निर्मला सीतारामन पिथौरागड जिल्ह्यात एका वैद्यकीय शिबिराच्या उद्घाटनासाठी येण्यापूर्वी या दोघांविरोधात अटकेची कारवाई करण्यात आली.

उत्तराखंड दौऱ्यावर असलेल्या सीतारामन यांच्या हत्येचा कट आखला जात असल्याची माहिती पोलीस यंत्रणेला लागली. हॉट्सअॅपवर चॅटिंग करणारे दोघेही दारुच्या नशेत होते, अशी माहिती प्राथमिक तपासात उघड झाली आहे. मात्र हा प्रकार नशेत घडला की यामागे काही हेतू होता? याचा तपास पोलीस करत आहेत. ज्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये हे दोघे जण चॅटिंग करत होते त्या ग्रुपची सुद्धा चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

सुषमा अंधारे यांच्यावर अज्ञातांनी केलेल्या भ्याड हल्ल्याची चौकशी करा- सुप्रिया सुळे