तोतया पोलिसाने पळविला अडीच तोळे सोन्याचा हार

नांदेड: जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. शहरातील जुन्या बसस्थानक परिसरात एका वृद्ध व्यक्तीला तू तोंडाला मास्क का बांधला नाही, तुझे आधार कार्ड दाखव, असे म्हणत तोतया पोलिसाने वृध्दा जवळील सव्वा लाख रुपये किंमतीचा अडीच तोळे सोन्याचे पोहे हार घेऊन पलायन केल्याची घटना घडली. ही घटना गुरुवारी दुपारी एक ते दीड च्या दरम्यान घडली. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

कोरोनाचा कहर वाढत असल्याने सगळीकडे सध्या लॉकडाऊन आहे. मात्र एप्रिलमध्ये लग्नसराई असल्याने अनेकजण देगलूर शहरामध्ये खरेदीसाठी येत आहेत. तेलंगणातील तडगूर मंडल मदनूर येथील बसवंत भीमराव सोमावार हे गुरुवारी,८ एप्रिल रोजी आपल्या मुलाचे लग्न असल्याने नवरीला सोन्याचा अडीच तोळे वजनाचे तयार केलेला पोहेहार घेऊन जात होते. सोमावार हे जुना बसस्थानक येथील एका मेडिकल जवळ थांबलेले असताना सोमावार यांच्याजवळ एक व्यक्ती आला आणि त्याने तुमच्या तोंडाला मास्क नाही, तुमचे आधार कार्ड कुठे आहे, अशी चौकशी केली.

त्यावेळी सोमावार यांना विचारणारा व्यक्ती पोलीस आहे, असे समजून त्याला एप्रिलला माझ्या मुलाचं लग्न आहे, मी दागिने खरेदीसाठी आलो आहे, असे सांगितले. त्यावेळी तोतया पोलिसाने तू खोटं बोलत आहे, मला बनवू नको, तुझ्याजवळ पावती कुठे आहे. असे प्रश्न केले.भांबावलेल्या सोमावार यांनी आपल्याजवळील सव्वा लाख रुपये किंमतीची पावती आणि सोन्याचा दागिना दाखवला.

महत्त्वाच्या बातम्या :