ट्विटरची कंगना रनौतवर मोठी कारवाई ; कंगनाचे ट्विटर हँडल सस्पेंड

मुंबई : अभिनेत्री कंगना रनौत कोणालाही लक्ष्य करण्याची कोणतीही संधी सोडत नाही. कंगना नेत्यांपासून ते बॉलिवूड सेलेब्रिटीपर्यंत सर्वांनाच वेठीस धरते. कंगना सध्या राजकीय घडामोडींमध्ये बरीच सक्रिय दिसत आहे. महाराष्ट्र्रत चालू असलेल्या घडामोडींवर कंगना नेहमीच ट्विट करत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंगणाचे ट्वीटर अकाऊंट म्हणजेच तिचे शस्त्र असे मानले जात होते.

परंतु आता कंगणाचे शस्त्र ट्वीटर ने काढून घेतलेले आहे. म्हणजेच तिचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे. हि खूप मोठी कारवाई ट्विटरने कंगना रनौतवर केलेली आहे. ट्विटरच्या नियमांचं उल्लंघन करणारी पोस्ट शेअर केल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली. बंगाल हिंसाचारावरील ट्वीट्सनंतर कारवाई करण्यात आली. नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये झालेल्या कथित हिंसाचाराबद्दल अभिनेत्रींनी ट्वीटच्या करत आक्षेपार्ह भाष्य केले होते.

ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात टीएमसी विजयी झाल्यानंतर कंगनाने पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. अभिनेत्री कंगना रनौतने मायक्रो-ब्लॉगिंग साईटच्या नियमांविरूद्ध मजकूर पोस्ट केल्यानंतर तिचे ट्विटर अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या