संजय राऊत यांचे ट्वीट शेलारांना झोंबले; शिवसेना-भाजपमध्ये ट्वीटरवॉर

टीम महाराष्ट्र देशा- शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ट्वीटर च्या माध्यमातून टीका केल्यानंतर आता सेना भाजप मध्ये ट्वीटरवॉर सुरु झाल आहे. नीरव मोदी पीएनबी बँकेला ११ हजार कोटींचा चुना लावून पळून गेला त्यावरून देशभरातून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि इतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केलीच पण शिवसेनाही त्यात मागे नाही.संजय राऊत यांनीही  ट्वीट करून मोदींवर टीका केली होती याला प्रत्युत्तर देताना सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका ती थुंकी तुमच्याच तोंडावर पडेल असं म्हणत  भाजपा नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांच्यावर निशाना साधला आहे.

पैसे बॅंक मे रखो तो नीरव मोदी का डर..घर मे  रखो तो नरेंद्र मोदी का.. असं ट्वीट  खासदार संजय राऊत यांनी केलं होत.

आशिष शेलार यांचा पलटवार

या ‘ट्वीट’ला  भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. प्रभादेवीच्या गल्लीत काहींना मोदी या शब्दाशी यमक जुळवणारे काव्य काहींना सुचले. तेव्हाच कळले की शिमगा जवळ आला आहे. तसा वर्षभर यांचा शिमगाच असतो म्हणा. पण उगाच यमकासाठी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नका ती थुंकी तुमच्याच तोंडावर पडेल असा ट्विट आशिष शेलार यांनी केला आहे.

 

 

You might also like
Comments
Loading...