ट्विटर संमेलनाला 3 फेब्रुवारीपासून सुरुवात

मुंबई : अखिल भारतीय साहित्य संमेलनाची 3 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. हेच निमित्त साधत ऑनलाईन व्यासपीठावर ट्विटर संमेलनही घेतले जाणार आहे. ‘मराठी वर्ड’ या ट्विटर अकाऊंट ग्रुपने ट्विटर संमेलनाचं आयोजन केले आहे. 3 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान ट्विटर संमेलन असेल. यामध्ये ट्विटरवरील मराठी यूझर्सना सहभागी होता येणार आहे.

“मराठीचे ट्विटरविश्व अधिकाधिक फुलावे आणि मराठीत रोज एक लक्ष ट्विट्स लिहल्या जाव्यात ह्या ध्येयातूनच #ट्विटरसंमेलन ह्या कल्पनेचा जन्म झाला.”, असे ‘मराठी वर्ल्ड’ टीमकडून सांगण्यात येते आहे.

यंदाचे ‘ट्विटर संमेलन’ 3, 4, 5 आणि 6 फेब्रुवारी 2017 रोजी भरवलं जाणार आहे.

ट्विटर संमेलनाचा मुख्य हॅशटॅग #ट्विटरसंमेलन आहे आणि सोबत 12 हॅशटॅग देण्यात आले आहेत.

12 हॅशटॅग :

#माझीकविता
#माझीकथा
#माझाब्लॉग
#माझीबोली
#साहित्यसंमेलन
#वाचनिय
#हायटेकमराठी
#बोलतोमराठी
#मराठीशाळा
#भटकंती
#खमंग
#माझाछंद