ट्विटरवर ट्वीट करण्यासाठी शब्दांची मर्यादा वाढणार

 वेब टीम:- सध्या व्यक्त होण्यासाठी फेसबुक, ट्विटर अश्या प्रभावी सोशल मीडियाचा जास्ती वापर केला जातो. पण प्रत्येकाच्या काही ना काही नियम व अटी आहेतच. फेसबुक वर कितीही लिहू शकतो किंवा फोटोज शेयर करू करू शकतो . पण ट्विटर मात्र याबाबत शब्दांची मर्यादा होती ती आता वाढवण्यात येणार असल्याची माहिती ट्विटर च्या अधिकृत अकाउंट वरुन देण्यात आली आहे.

सध्या ट्विटरच्या ‘What’s happening’च्या स्पेसमध्ये केवळ 140 कॅरेक्टर्समध्येच व्यक्त होता येतं. मात्र यापुढे व्यक्त होण्यासाठी कॅरेक्टर्स मर्यादा वाढवण्यात येणार आहे. 140 वरुन 280 कॅरेक्टर्स म्हणजे आताच्या संख्येच्या बरोबर दुप्पट कॅरेक्टर संख्या केली जाणार आहे. त्यासाठी ट्विटरकडून टेस्टिंगही सुरु झाली आहे.ट्विटरने विशिष्ट ग्रुपमध्ये 280 कॅरेक्टर्सचा प्रयोग करुन पाहिला. त्याआधी ट्विटरकडून संशोधनही करण्यात आलं. विशेषत: जपानी आणि इंग्रजी भाषेबाबत तुलना करुन ट्विटरने हा कॅरेक्टर मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्विटरने या नव्या टेस्टिंगबाबत माहिती देण्यासाठी एक ट्विट केला आहे. विशेष म्हणजे या ट्विटमध्ये त्यांनी 220-225 कॅरेक्टर्स वापरले आहेत. कॅरेक्टर्स लिमिटमध्ये होऊ घातलेल्या नव्या बदलाची माहिती देणाऱ्या ट्विटमध्येच ट्विटरने टेस्टिंग केले आहे.आलिया रोझन यांनी ब्लॉग लिहूनच यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. आलिया रोझन या ट्विटरच्या प्रोड्युसर मॅनेजर आहेत. कॅरेक्टर्स लिमिट वाढवण्यामागची भूमिका आलिया रोझन यांनी ब्लॉगमधून मांडली आहे.

You might also like
Comments
Loading...