हॅशटॅग साजरा करतोय १०वा वाढदिवस

hashtag celebrates 10th birthday

आजकाल इंटरनेट किंवा सोशल माध्यमांचा विषय आला की कुणी पोस्टमध्ये काय हॅशटॅग दिले याची चर्चा होते. हॅशटॅग हा इतका आजकाल आपल्या जीवनाचा अविभाज्य घटना बनला आहे की विचारू नका. या हॅशटॅगने आपले जग इतके व्यापले आहे की हॅशटॅग नावाने पुण्या मुंबई सारख्या शहरात अगदी कॅफे सुरु झाले. परंतु आपल्यातील किती लोकांना ही गोष्ट माहित आहे की या हॅशटॅगचा जन्म कसा झाला किंवा आता हॅशटॅग सुरु होऊन किती वर्ष झाली आहेत.

असा झाला हॅशटॅगचा जन्म
तब्बल १२५ ते १३० मिलियन वेळा एका दिवसात वापरले जाणारे हॅशटॅगची सुरुवात आजच्या दिवशी अर्थात २३ ऑगस्ट २००७ रोजी झाली. गुगल आणि उबेर या दिग्गज कंपन्यांमध्ये अभियंता म्हणून जबाबदारी पार पाडलेल्या ख्रिस मेस्सीणा यांनी पहिल्यांदा हॅशटॅगला जोडून #barcamp हा शब्द ट्विट केला होता. हॅशटॅगचा जन्म हा त्याच दिवशी ट्विटरवर झाला.

ज्या ट्विटमध्ये हॅशटॅगचा जन्म झाला तो ट्विट:

आज हॅशटॅगची तरुणाईला भुरळ:
आज कोणत्याही सोशल मीडिया वेबसाइटवर आपण गेलात तरी कोणत्याही फोटोला एकवेळ आपल्याला कॅप्शन दिसणार नाही परंतु हा हॅशटॅग नक्की दिसतो. इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर आणि अनेक माध्यमांवर हे हॅशटॅग वापरले जातात. सुंदर फोटो किंवा लेख प्रसिद्ध होण्यासाठी हे हॅशटॅग वापरले जातात.

मराठीमधील पहिला हॅशटॅग कोणता?
#वांद्रेकुणाचे हा मराठी भाषेतील पहिला हॅशटॅग आहे. याचा जन्म एप्रिल २०१५मध्ये झाला.

काय असतो या हॅशटॅगचा उपयोग?
या हॅशटॅगमुळे एखाद्या विषयावर अनेक लोकांची मते आपल्याला पाहायला / वाचायला मिळतात. अगदी आपण ज्या लोकांना कधी भेटलोही नाही किंवा पाहिलेही नाही असे लोक या हॅशटॅगमुळे एकमेकांची मते समजून घेऊन शकतात. हॅशटॅगमुळे त्या शब्दाची एक खास लिंक तयार होते ज्यावर क्लिक करून आपण अनेक गोष्टी वाचू शकतो.

सर्वाधिक वेळा वापरले गेलेले हॅशटॅग:
१. #BlackLivesMatter
२. #EdBallsDay
३. #TheDress
४. #HeForShe
५. #PutYourBatsOut