ट्विटरकडून अक्षर मर्यादेत दुपटीने वाढ

ट्विटरने १४० अक्षरांच्या मर्यादेत वाढ करुन ती आता २८० इतकी केली आहे. त्यामुळे आता ट्वीट करायचे असेल तर मोकळ्या हाताने करता येणे शक्य होणार आहे. मात्र चायनिज, जॅपनिज आणि कोरियन भाषेसाठी अक्षर मर्यादा तेवढीच ठेवण्यात आली आहे. ब-याचदा ट्विट्स हे इंग्रजी माध्यमातून केले जातात. त्यामुळे १४० ची अक्षरमर्यादा असल्यामुळे कमी लिहावे लागते. तसेच अधिक वेळ ट्विट एडिट करण्यातच जातो, असे ट्विटरकडून सांगण्यात आले आहे. मराठी भाषेत काना, मात्रा जास्त असल्याने ट्वीट करण्यासाठीही वाढीव अक्षर मर्यादेचा फायदा होणार आहे.