चमकोगिरी करणाऱ्या या दिग्गज नेत्यांचा ट्विटरकडून पर्दाफाश

-modi-and-rahul-gandhi

राहुल गांधीं तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर आणि फेसबुकवरील त्यांच्या फॉलोअर्सची संख्या कोटींमध्ये असल्याचं आपल्याला पहायला मिळत ,मात्र, ट्विटरकडून नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या एका अहवालात या दोघांचे जवळपास निम्मे फॉलोअर्स बोगस असल्याची माहिती समोर आली आहे.

ट्विटरच्या ऑडिट रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार,काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटवरील तब्बल ४९ टक्के फॉलोअर्स बोगस आहेत. तर काँग्रेस पक्षाचे ट्विटर अकाऊंट फॉलो करणाऱ्यांपैकी ६९ टक्के फॉलोअर्स बोगस आहेत. दुसऱ्याबाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तब्बल ४५ टक्के फॉलोअर्स बोगस आहेत. दोन महिन्यांपूर्वीच्या माहितीच्या आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. त्यानुसार मोदींच्या एकूण फॉलोअर्सपैकी १,८२,९५, १८५ फॉलोअर्स खरे आहेत, तर १,४४,९१, ८८४ फॉलोअर्स बोगस आहेत.

मोदींशिवाय भाजप नेत्यांचा विचार करायचा झाल्यास केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या ट्विटर अकाऊंटवर सर्वाधिक बोगस फॉलोअर्स आहेत. राजनाथ सिंह यांचे तब्बल ६४ टक्के फॉलोअर्स बोगस आहेत. त्यानंतर बोगस फॉलोअर्सच्याबाबतीत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा क्रमांक लागतो. त्यांचे ७३ टक्के फॉलोअर्स बोगस आहेत. तर भाजपच्या ट्विटर अकाऊंटवरील ७१ टक्के फॉलोअर्स बोगस असल्याचे समोर आले आहे. याशिवाय, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे केवळ २२ टक्के फॉलोअर्स खरे असल्याची माहिती समोर आली आहे.

आता हे बोगस फॉलोअर्स कुठून आले ,ते कोणी निर्माण केले हा संशोधनाचा भाग असला तरी सर्वपक्षीय नेतेमंडळी लोकांवर छाप पाडण्यासाठी अशा बोगस फॉलोअर्सचा आधार घेत असल्याचं यावरून समोर आलं आहे.