मोदी सरकारसमोर ट्विटरही झुकले! नवीन नियमांचे पालन करण्याचे ट्विटरकडून आश्वासन

tweeter

नवी दिल्ली: केंद्र सरकारने समाजमाध्यम क्षेत्रात सेवा पुरवणाऱ्या ट्विटर, फेसबुक, व्हॉट्सअॅप, अशा कंपन्यांसाठी नवी नियमावली जारी केली. तसेच, या नियमावलीमधील तरतुदींचं पालन करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देखील दिली. सोशल मीडियावरील एक लोकप्रिय माध्यम असलेल्या ट्विटरनं अजूनही या नियमावलीनुसार अंमलबजावणी केली नसल्यामुळे आता केंद्र सरकारने ट्विटरला शेवटचा इशारा दिला होता. त्यानंतर आता ट्विटरने नव्या गाइडलाइन्सचं पालन करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं भारत सरकारला आश्वासन दिलं आहे.

दरम्यान आता नव्या नियमानुसार, सर्व सोशल मीडिया कंपन्यांना तक्रार निवारण अधिकारी आणि त्यांचा पत्ता याबाबतची माहिती आपल्या वेबसाईट आणि अ‍ॅपवर द्यावी लागेल. यावेळी तक्रार करण्याची पद्धतही सांगावी लागेल, जेणेकरुन युजर्स आपली तक्रार नोंदवू शकेल. तक्रार अधिकाऱ्याला २४ तासांच्या आत तक्रार नोंदवल्याबाबतची माहिती द्यावी लागणार असून त्यानंतर १५ दिवसांच्या आत त्या तक्रारीचा  निकाल लावावा लागणार आहे.

तसेच प्रमुख सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी तक्रार निवारण अधिकारी, नोडल अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांची नेमणूक करणं आवश्यक आहे. तसंच या अधिकाऱ्यांची नियुक्ती भारतात व्हावी असं देखील सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP