पंतप्रधान मोदी यांचे वैयक्तिक वेबसाईटचं ट्विटर अकाऊंट हॅक, हॅकर्सकडून बिटकॉइनची मागणी

modi twitter

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वैयक्तिक वेबसाईटचे ट्विटर अकाऊंट हँक करण्यात आलं असून हॅकर्सने बिटकॉइनची मागणी केली आहे. हॅकर्सने ट्विट करून पीएम रिलीफ फंडामध्ये क्रिप्टो चलनाद्वारे देणगी मागितली होती. काही काळानंतर त्यांच खातं पुर्वरत करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वैयक्तिक वेबसाईटच ट्विटर खातं असून या अकाऊंटवरुन पंतप्रधानांनी भारतीय जनतेकडे कोरोनाच्या लढ्यासाठी आर्थिक मदत करण्याचं अवाहन केलं होतं.

बिटकॉइन म्हणजे काय?

बिटकॉइन एक आभासी चलन आहे. 2009 मध्ये.बिटकॉइन उदयास आले होते.याचा वापर जागतिक पेमेंटसाठीसुद्धा केला जातो.म्हणून हॅकर्सकडून अशा पद्धतीच्या व्यवहाराची मागणी करण्यात आली होती.त्यानंतर याचा वापर मोठ्या प्रमाणात अॉनलाईन माफीयांकडून झाला.

राष्ट्रवादीच्या ‘या’ दमदार आमदाराला कोरोनाची लागण

पंतप्रधानांंचे ट्विट अकाऊंट हॅक होणे ही खूप मोठी धक्कादायक बातमी आहे. यावरुनच आता सोशल मीडिया किती सुरक्षित आहे, याची कल्पना आपण करु शकतो. याआधीही अनेक अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची खाती हॅकर्सकडून हॅक केली गेली होती. पण आता या प्रकरणानंतर याला एक वेगळं वळण लागले आहे. हा राष्ट्रीय सुरक्षिततेचाही मुद्दा आहे. आता यावर केंद्र सरकार काय कारवाई करते याची उत्सुकता आहे.

पुण्याच्या माजी महापौरांनाच नाही मिळू शकला बेड, तर मृत्यूनंतरही अंतिम संस्कारात आल्या अडचणी