सॅनिटरी पॅडवर टॅक्स आहे मग व्हायग्रावर टॅक्स का नाही ?

टीम महाराष्ट्र देशा- ट्विंकल खन्नाने तिच्या ट्विटर हँडेलवरुन ट्विट केले सध्या चर्चेचा विषय बनलं आहे ‘भारतात सॅनिटरी पॅडवर टॅक्स आहे पण, व्हायग्रावर नाही असे का? …कारण ६५ वर्षाची म्हातारे पुरुष ही धोरणे तयार करतात म्हणून.’ असं ट्विट ट्विंकल ने केलं आहे .

मासिक पाळीत प्रत्येक महिलेची गरज असलेले सॅनिटरी पॅड करमुक्त करावेत अशी सर्वच महिलांची मागणी आहे. सॅनिटरी पॅडवर कररुपी अधिकभार लावला जात असल्याने काही महिलांना ते विकत घेणे परवडत नाही. तर दुसरीकडे पुरुषांना शारीरिक सुखाचा आनंद अधिक काळ उपभोगता यावा यासाठी घेतले जाणारे व्हायग्रा मात्र करमुक्त आहे. पण, हे काही शारीरिक स्वच्छतेसाठी वापरले जात नाही किंवा प्रत्येक पुरुषाची ही गरजसुद्धा नाही, असेही ती म्हणाली.

अमेरिकेतील अनेक ठिकाणी सॅनिटरी पॅडवर कर लावला जातो पण व्हायग्रावर नाही असे का, असा सवाल ट्विंकलला ‘बीबीसी’च्या ‘व्हिक्टोरिया डर्बीशायर’च्या कार्यक्रमात विचारण्यात आला. त्यावर ती म्हणाली की, व्हायग्रा करमुक्त करण्याचे धोरण एका ६५ वर्षीय पुरुषाने आणले हे त्यामागचे कारण आहे.

सध्या या ट्विटची जोरदार चर्चा सुरु आहे. ट्विंकलचा पती अक्षय कुमारचा पॅडमॅन हा चित्रपट रिलीज होणार आहे. त्या संदर्भात तिने हा ट्विट केला आहे. यात तिच्या ट्विटवर तीव्र प्रतिक्रिया येत आहेत. लोकांनी निवडूण दिलेल्या बुजुर्ग प्रतिनिधींबाबत असे बोलणे शोभत नाही असा नेटकऱ्यांचा रोख आहे. तर हे सगळे प्रसिध्दीसाठी सुरु आहे, असेही काहींचे मत आहे.

You might also like
Comments
Loading...