मलिकजी सांगा कधी येऊ काश्मीरला, राहुल गांधी भिडले काश्मीरच्या राज्यपालांना

blank

टीम महाराष्ट्र देशा: कलम ३७० हटवल्यानंतर काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवरून कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी आणि राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध सुरु आहे. काश्मीरमधील परिस्थितीवर राहुल गांधी यांनी भाष्य केले होते. गांधी यांना उत्तर देताना सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधी यांनी काश्मीरची परीस्थीती पाहून बोलावे, त्यांना काश्मीरला भेट देण्यासाठी आम्ही विमानाची देखील व्यवस्था करतो असं विधान केले होते.

दरम्यान, मलिक यांना उत्तर देताना राहुल गांधी यांनी काश्मीर खोऱ्यात कधी येऊ हे सांगा असा प्रश्न विचारला आहे. प्रिय मलिक जी, मी माझ्या ट्विटवर तुमची प्रतिक्रिया पाहिली. मी विनाअट लोकांना भेटण्यासाठी तयार आहे. मी कधी आणि केव्हा यायचं? असा प्रश्न गांधी यांनी ट्विटद्वारे केला आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात जम्मू-काश्मीरमध्येकाय चाललं आहे, याची माहिती पंतप्रधान मोदींनी देशाला द्यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी दोन दिवसांपूर्वी केली होती, यावर गांधी यांनी काश्मीरची परीस्थीती पाहून बोलावे, त्यांना काश्मीरला भेट देण्यासाठी आम्ही विमानाची देखील व्यवस्था करतो असं उत्तर जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केले होते.

महत्वाच्या बातम्या