TVS Bike Launch | TVS ने केली आपली ‘ही’ बाईक लाँच

टीम महाराष्ट्र देशा: आघाडीची टू व्हीलर उत्पादक कंपनी TVS (टीव्हीएस) ने सप्टेंबर 2021 मध्ये TVS Raider लाँच करून पुन्हा एकदा 125cc सेगमेंटमध्ये प्रवेश केला. या बाईकला ग्राहकांकडून पसंती मिळाल्यानंतर टीव्हीएस आता आपल्या ग्राहकांसाठी या सेगमेंटचे अपडेटेड व्हर्जन घेऊन आले आहे. कंपनीने या बाईकची नेक्स्ट जनरेशन 2022 TVS Raider लाँच केली आहे. TVS Rider प्रमाणेच ग्राहकांना ही नवी टू व्हीलर देखील ग्राहकांकडून पसंती मिळेल अशी आशा कंपनीने व्यक्त केली आहे.

2022 TVS Raider इंजिन

TVS ची ही नवीन बाईक 124.8cc,3-व्हॉल्व्ह, एअर/ऑइल-कूल्ड, सिंगल-सिलेंडर, FI इंजिन 2021 मॉडेल इंजिनसह सुसज्ज आहे. हे इंजिन 11.2bhp ची मॅक्झिमम पॉवर आणि 11.2Nm पीक टार्क जनरेट करते. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्स जोडलेले असून ही बाईक फक्त 5.9 सेकंदात 0-60km प्रतीतास वेग पकडू शकते.

लुक

TVS ने आपल्या 2022 TVS Raider चे लुक थोडे बदलले आहे. ही बाईक 17-इंच अलॉय व्हील, टेलिस्कोपिक फोर्क्स, रोबोट-शैलीतील हेडलॅम्प्स, मोनोशॉक आणि स्लीक टेल सेक्शन डिझाइन, 10-लिटर फ्युल टॅंकसह सुसज्ज आहे. त्याचबरोबर ही नवीन बाईक वेगवेगळ्या नवीन रंगांमध्ये लाँच करण्यात आलेली आहे. या बाईकमध्ये समोर 240mm डिस्क ब्रेक असून मागील बाजूस 130mm ड्रम देण्यात आलेला आहे.

फीचर्स

2022 TVS Raider मध्ये एसएमएस अलर्ट, व्हॉईस असिस्टंट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, म्युझिक कंट्रोल, कॉल अलर्ट, ब्लूटूथ, 5-इंच TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर इत्यादी फीचर्स आहेत. त्याचबरोबर तुमचा रायडिंग एक्सपिरीयन्स अधिक चांगला बनवण्यासाठी यामध्ये इको आणि पॉवर असे दोन रायडिंग मोड देण्यात आले आहेत.

2022 TVS Raider किंमत

TVS च्या 2022 TVS Raider किंमत 99,990 (एक्स शोरुम) एवढी आहे.

महत्वाच्या बातम्या 

टीम महाराष्ट्र देशा: आघाडीची टू व्हीलर उत्पादक कंपनी TVS (टीव्हीएस) ने सप्टेंबर 2021 मध्ये TVS Raider लाँच करून पुन्हा एकदा …

पुढे वाचा

Cars And Bike